शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

बांधकाम व नगररचना विभाग

  • श्री. नितीन दशरथ गाढवे
    मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी
  • श्री. संजीव तानाजी जाधव
    नगरअभियंता

शासनाकडील बांधकाम विभागाच्या विविध योजना

नागरी सुविधा पुरविण्यासाठी सहाय्य योजने अंतर्गत प्रामुख्याने खालीलप्रमाणे कामे घेता येतात.
    1. नवीन प्रशासकीय इमारत
    2. नगरपंचायती अंतर्गतचे प्रमुख नागरी मार्ग व त्यालगत नाल्या.
    3. नगरपंचायतीच्या क्षेत्रातील प्रमुख रस्त्यावरील पथदिवे व्यवस्था करणे
    4. बगीचे व त्यामधील दिव्यांची व्यवस्था
    5. सभागृह बांधकाम
    6. स्मशानभुमी विकसीत करणे
    7. हरीत पट्टे विकसीत करणे
    8. पाणीपुरवठा करीता अत्यावश्यक कामे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान (जिल्हास्तर) योजने अंतर्गत प्रामुख्याने खालीलप्रमाणे कामे घेता येतात.

    1. घनकचरा व्यवस्थापन
    2. पाणीपुरवठा व जलनिस्सारण व नागरी स्वच्छता
    3. सामाजिक पायाभूत सुविधाचा विकास
    4. नागरी दळणवळण साधनांचा विकास
    5. अपारंपिक उर्जास्त्रोत विकास
    6. शालेय शिक्षणांशी निगडीत पायाभूत सुविधांचा विकास
    7. नागरी आरोग्याशी निगडीत पायाभूत विकास व सुविधा
    8. संकीर्ण कामे.
लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजने अंतर्गत प्रामुख्याने खालीलप्रमाणे कामे घेता येतात.
    1. दलित वस्ती प्रभागातील रस्ते
    2. जोडरस्ते
    3. रस्त्याचे डांबरीकरण
    4. सिमेंटीकरण नाली, शौचालय
    5. बालवाडी
    6. बगीचे
    7. समाजमंदिर
    8. वाचनालय
    9. व्यायाम शाळा
    10. स्मशानभुमीचा विकास यासारखी अन्य कामे हाती घेता येतील
नागरी दलितेत्तर वस्ती सुधारणा योजने अंतर्गत प्रामुख्याने खालीलप्रमाणे कामे घेता येतात.
    1. रस्ते, अंतर्गत रस्ते व गटारी
    2. पाणीपुरवठा
    3. मलनिस्सारण
    4. पर्जन्य जलाचा निचरा
    5. घनकचरा व्यवस्थापन
    6. पथदिवे
शहरातील रस्ते विषयक कामे
  1. शहरी भागातील पाणीपुरवठ्याची व मलनिस्सारणाची कामे/पाणीपुरवठ्याकरिता अत्यावश्यक कामे
  2. प्रमुख नागरी मार्ग व त्यालगतच्या नाली बांधणे/विस्तार करणे/स्वच्छ करणे
  3. प्रमुख रस्त्यावरील पथदिवे, हायमस्ट/प्रमुख रस्त्यावरील पदपथ यांची व्यवस्था करणे/पर्जन्य जलवाहिन्या बांधणे
  4. सामाजिक सभागृह/समाज मंदिर/व्यायाम शाळा/वाचनालय इत्यादी समाजोपयोगी बांधकामे/व्यापारी संकुल बांधणे/आठवडी बाजार
  5. शौचालय/मुता-या बांधणे
  6. मोकळ्या जागेचे, मैदानात /उद्यानात रूपांतर करणे, उद्यानाची श्रेणीवाढ करणे.
  7. सार्वजनिक मालकी असलेल्या ऐतिहासिक वास्तुंचे संरक्षण करणे
  8. नवीन प्रशासकीय इमारत/अस्तित्वातील प्रशासकीय इमारतीचे विस्तारीकरण/नुतनीकरण
  9. बगिचे व बगिच्यामधील दिव्यांची व्यवस्था
  10. स्मशानभूमी विकसित करणे
  11. हरीत पट्टे/अमृतवने विकसीत करणे.
  12. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या मुलभूत कर्तव्याशी निगडीत नागरी सेवा व पायाभूत सुविधा यांच्याशी संबंधित इतर कोणतीही कामे.

शासन नगरविकास विभागाकडील आदेशानुसार शिराळा नगरपंचायत मध्ये बांधकाम परवानगी ऑनलाईन पद्धतीत देणेत येते. सदरची बांधकाम परवानगी साठी https://mahavastu.maharashtra.gov.in/index.php?signin=1  या वेबसाईटवर जाऊन अर्ज करणेत यावा.

नगरपंचायत हद्दीतील बांधकाम परवानगी कामी लायसन्स धारक वास्तुविशारद (Architect), अभियंता (Engineer), सुपरवायझर इ. ची नोंदणीपत्र ऑनलाईन देण्यात येते

बांधकाम परवानगी साठीची माहिती डाउनलोड करा