Skip to main content

शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

प्रधानमंत्री आवास योजना

  • श्री. सूरज कल्पना मधुकर कांबळे
    मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी
  • श्री.मुनीर अहमद म.रफिक लंगरदार
    योजना कक्ष -स्थापत्य अभियंता

प्रधानमंत्री आवास योजनेचा उद्देश  

 केंद्र सरकारने सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना(शहरी ) या संकल्पनेतून शहरी भागातील  आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक/ अल्प उत्पन्न घटकातील  गरीब रहिवाश्यांना सर्व सोयीयुक्त पक्की घरे मिळवी व रहिवाश्यांच्या निवासाच्या समस्यांचे समाधान व्हावे या उद्देशाने ही योजना सुरु केली आहे.

सर्वसाधारण माहिती

   सर्वांसाठी घरे प्रधानमंत्री आवास योजना(शहरी )या  योजनेची अंमलबजावणी शहरी विभागात होईल.यासाठी केंद्र सरकार,राज्य सरकारच्या माध्यामतून पात्र कुटुंबाना/लाभार्थ्यांना घरे बांधण्यासाठी स्थानिक संस्थाना मदत पुरवेल.

१) लाभार्थी/कुटुंबामध्ये पती,पत्नी व त्यांची अविवाहित मुले आणि मुलांचा समावेश असेल.

२) लाभार्थी/कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे संपूर्ण भारतात कोठेही पक्के घर नसावे. 

३) योजने अंतर्गत सर्व प्राथमिक सुविधांनी युक्त ३० चौ.मी.चटई क्षेत्र बांधकामास अर्थसहाय्य देण्यात येते. प्राथमिक सुविधांमध्ये पिण्याचे पाणी,प्रसाधन,सांडपाणी व्यवस्था,रस्ते,विद्युत पुरवठा इत्यादी सोयींचा समावेश होतो.

४) या योजनेतून बांधण्यात येणाऱ्या घराचा नकाशा बांधकाम नियामवली नुसार असावा.बांधण्यात येणाऱ्या घरामध्ये प्रसाधनगृह असणे आवश्यक आहे.

५) बांधकाम संरचना ही भूकंपरोधक तसेच पूर,चक्रीवादळ सारख्या आपत्ती पासून बचाव करण्यास पात्र असावीत.

६) ह्या योजने अंतर्गत बांधण्यात येणारी घरे कुटुंबातील स्त्री-पुरुष यांच्या संयुक्त नावे केली जातील.

प्रधानमंत्री आवास योजना कक्ष ( City Level technical Cell )

कक्षात मंजूर पदाची संख्या : ०१ 

मंजूर पदाचे नाव : स्थापत्य अभियंता 

प्रधानमंत्री आवास योजना कक्षाचे कामकाज

  • १. योजनेच्या अंमलबजावणी साठी माहित फलक,संदेश प्रसारण याद्वारे जनजागृती व लाभार्थी मेळावे आयोजित करणे.
  • २. घरकुलांचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या अनुषंगाने सर्व घटकांतर्गत घरकुलांचे प्राथमिक सर्वेक्षण करून अर्ज स्वीकारणे व स्थळ पाहणी करणे.
  • ३. प्राप्त अर्जांची छाननी करून पात्र लाभार्थ्यांचा सविस्तर प्रकल्प अहवाल मंजुरीसाठी शासनास सादर करणे.
  • ४. मंजूर लाभार्थ्यांना बांधकाम परवाना देणे व घरकुल बांधकाम बाबत माहिती देणे.
  • ५. मंजूर लाभार्थ्यांना निधी वितरण कार्यपद्धती व इतर तांत्रिक बाबी संदर्भात मार्गदर्शन देणे.
  • ६. लाभार्थ्यांना मंजूर झालेल्या निधी मागणी साठी शासनांकडे वेळोवेळी पाठपुरावा करणे.
  • ७. लाभार्थ्यांची स्थळ पाहणी करून बांधकामच्या प्रगतीची माहिती घेणे व बांधकामच्या प्रगतीनुसार लाभार्थ्यांना निधी वाटप करणे.
  • ८. मंजूर लाभार्थ्यांची भौतिक व आर्थिक प्रगतीचा अहवाल,निधी उपयोगिता प्रमाणपत्र इत्यादी माहिती शासनास सादर करणे.

प्रधानमंत्री आवास योजनेची सद्यस्थिती

शिराळा नगरपंचायतीस प्रधानमंत्री आवास योजनातून पात्र लाभार्थ्यांच्या एकूण ४ प्रस्तावामध्ये (डीपीआर) ३५७ घरकुलास मंजुरी मिळाली आहे.
*(आकडेवारी-फेब्रुवारी 2023 पर्यंतची)
मंजूर यादी (DPR) क्र.मंजूर लाभार्थी संख्या बांधकाम परवानगी बांधकाम सुरु असलेल्या घरांची संख्या बांधकाम पूर्ण झालेल्या घरांची संख्या एकूण सुरु कामे संख्या रद्द करण्यात आलेले लाभार्थी संख्या
यादी क्र.१ ५१ ३३०२३१३३१८
यादी क्र.२४० २४०९१५२४१६
यादी क्र.३६१ ३२०९२२३१२९
यादी क्र.४२०५ १२०१२००१२०८५
एकूण ३५७ २०९१४०६८२०८१४८
NEW SURVEY (1)
NEW SURVEY (2)
NEW SURVEY (3)
NEW SURVEY (4)

प्रधानमंत्री आवास योजना संधर्भातील नवीन माहिती (ब्लॉग)