१ | ५ लाख लिटर | नाझरे गल्ली, गोपाळकृष्ण पथ, पवळ वस्ती, कवठेकर वस्ती, गायकवाड वाडा, शनिवार पेठ, घाशी वाडा, लक्ष्मी चौक, डांगे गल्ली, शिंदे गल्ली, कदम गल्ली, खबाले गल्ली, निकम गल्ली, कुरणे गल्ली, सोमवार पेठ, धरण रोड, पाडळी रोड, खटकुळी परिसर, गुरूवार पेठ |
२ | ३.५ लाख लिटर | प्राध्यापक कॉलनी, कुरणे वस्ती, नाईकसो नगर, प्राध्यापक कॉलनी-शाहूनगर, आपला बझार मागील परिसर, आण्णाभाऊ साठे समाज मंदिर परिसर, आश्रमशाळा रस्ता व परिसर, मुंडे वस्ती, गोरक्षनाथ रोड, गोरक्षनाथ कॉलनी, नवजीवन वसाहत, चिकुर्डेकर वस्ती, कदमवाडी, सुंगधानगर, बिरोबा कॉलनी, एस टी कॉलनी, राईस मील, कोकरूड रस्ता परिसर |
३ | १.५ लाख लिटर | लकी मंगल कार्यालय परिसर, बायपास रस्ता व परिसर, कापरी फाटा, सुजयनगर, सुरले वस्ती, रोकडे वस्ती, आय टी आय परिसर, शिवनगर, शिक्षक नगर खेड फाटा |
४ | १.५ लाख लिटर | नलवडे कॉलनी, पंचायत समिती मागील परिसर, शेटे वस्ती, आझाद कॉलनी, पिसाळ वस्ती, पेट्रोल पंप परिसर, व्ही बी पाटील नगर, श्री राम कॉलनी, करमाळे रोड |
५ | १ लाख लिटर | मटण मार्केट परिसर, दत्त नगर, नलवडे वस्ती |
पाणीपुरवठा व जलनिस्सारण विभाग
तत्कालीन ग्रामपंचायत काळात शिराळा व आसपासची १० गावे यांचेसाठी प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना २००५ साली राबविणेत येवून २०११ साली ती वापरात आली आहे. या अंतर्गत ३ द.ल.ली क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र, इंन्टेक वेल,जॅकवेल, २.५ किमी लांबी व ३०० मिमी व्यासाची लोखंडी रायझिंग मेन, तसेच अंदाजे जलवाहिन्या घालणेत आल्या.
ग्रामपंचायत कालीन राष्ट्रीय ग्रामीण पेयजल योजनेअंतर्गत शिराळा शहरासाठी २०१५-२०१६ मध्ये ३ नवीन उंच साठवन टाक्या बांधणेत आल्या असून विविध व्यासाच्या जलवाहिन्या घालणेत आलेल्या आहेत.
पाणीपुरवठा विभागाकडील कार्यवाही
पाण्याचा मुख्य उद्भव शहरापासून २.५ कि मी अंतरावर असणारे मोरणा धरण असून मोरणा धरणामधून उपसा करणेत आलेल्या पाण्यावर अंबामाता मंदिर परिसरात असलेल्या ३ दश लक्ष लीटर क्षमतेच्या मुख्य जलशुध्दीकरण केंद्रामध्ये विविध प्रक्रिया करणेत येऊन पाणी स्वच्छ व निर्जंतूक केले जाते तदनंतर जलशुध्दीकरण केंद्र येथून विविध क्षमतेच्या मोटारीद्वारे शहरातील विविध भागांमध्ये असलेल्या उंच साठवण टाक्यामध्ये पाणी भरून दैनंदिन सरासरी ३० ते ३५ मिनीटे पाणीपुरवठा केला जातो.
पाणीपुरवठा व्यवस्थेसाठी होणारा वीज वापर कमी करून विज बचत करण्याच्या अनुषंगाने जलशुध्दीकरण केंद्र व जॅकवेल येथे APFC Panel बसविण्यात आले आहेत.
शहरातील विविध ठिकाणी असणारे जलकुंभ (पाणी साठवण टाक्या)