शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

स्वच्छ भारत अभियान

  • श्री. नितीन दशरथ गाढवे
    मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी
  • प्रणव पांडुरंग महाजन
    शहर समन्वयक

स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 अंतर्गत चला नगरपंचायतने केलेली कार्यवाही खालील प्रमाणे.

  1. रँकिंग: 2021- 22 मध्ये शिराळा नगरपंचायत चा देशांमध्ये (वेस्ट झोन)79 वा क्रमांक आला होता, तसेच राज्यामध्ये 25 वा क्रमांक आला होता.
  2. शिराळा नगरपंचायत ने ODF++ साठी नामांकन पाठवले आहे.
  3. शिराळा नगरपंचायत ने गार्बेज फ्री सिटी (GFC) अंतर्गत थ्री स्टार मानांकनासाठी डिसेंबर 2022 मध्ये पोर्टल वरती अर्ज केला आहे.
  4. शंभर टक्के कचरा प्रक्रिया करण्याच्या उद्दिष्ट पूर्तीसाठी, नगरपंचायत मार्फत पुणे येथील प्लास्टिक वेस्ट मॅनेजमेंट कंपनी सोबत करार झाला आहे.
  5. तसेच ओला कचरा पासून कंपोष्ट खत बनवण्यात येते.
  6. नगरपंचायत मार्फत प्रत्येक आठवड्याला सफाई कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेतले जात आहे.यामध्ये घंटागाडी कर्मचारी, रस्ता लोटप कर्मचारी आणि मैला टाकी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.
  7. सफाई मित्र सुरक्षा चॅलेंज पूर्ण करण्यासाठी साहित्य खरेदी पूर्ण केली आहे. तसेच टूलकिटनुसार इतर माहिती अद्यावत केली आहे.

कचरा प्रकार आणि वर्गीकरण तक्ता

अ.क्र.प्रकारवजन (टन प्रति दिन)
1एकूण तैयार होणारा कचरा4.5
2एकूण तैयार होणारा ओला कचरा2.7
3एकूण तैयार होणारा सुका कचरा1.8
4एकूण तैयार होणारा घातक कचरा0.0016
5बांधकाम राडारोडा2
अ.क्र.कचरा प्रक्रिया केंद्र क्षमतावजन (टन प्रति दिन)
1ओला कचरा क्षमता8
2सुका कचरा क्षमता6.5
3घातक कचरा क्षमता0.015
4बांधकाम राडारोडा कचरा व्यवस्थापन क्षमता4

ओला कचरा: (Wet Waste)

शिराळा नगरपंचायत मार्फत 20000 लोकसंख्येचा प्रतिदिन 2.7 टन ओला कचरा तयार होतो. हा ओला कचरा हॉटेल आणि घरांमधून गोळा करण्यात येतो. यामध्ये भाज्यांची देठे, अंड्याची टरफले, पालापाचोळा, इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला ओला कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, पाच घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. गोळा झाल्यानंतर कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते, यामध्ये श्रेडींग मशीन द्वारे सर्व कचरा बारीक करून, खत करण्यासाठी वापरला जातो. तसेच भविष्यात कचऱ्यापासून गॅस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.

सुका कचरा: (Dry Waste)​

शिराळा नगरपंचायत मार्फत 20000 लोकसंख्येचा प्रतिदिन 1.8 टन सुका कचरा तयार होतो. हा सुका कचरा हॉटेल, बस्थानक, शासकीय कार्यालये , शाळा, दवाखाने आणि घरांमधून गोळा करण्यात येतो. यामध्ये  प्लास्टिक, कपडा, काच, कागद, पुठा, लोखंड इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला सुका कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, पाच घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. गोळा झाल्यानंतर सुका कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते, यामध्ये बेलिंग मशीन द्वारे सर्व कचरा एकत्र करून, प्लास्टिक पासून ऑइल काढण्यासाठी वापरला जातो.

घरगुती घातक आणि कचरा : (Domestic Hazardous and Sanitary Waste)

शिराळा नगरपंचायत मार्फत 20000 लोकसंख्येचा प्रतिदिन 0.0016 टन घातक कचरा तयार होतो. हा कचरा हॉटेल आणि घरांमधून गोळा करण्यात येतो. यामध्ये  सॅनिटरी नॅपकिन, औषधाचे डबे, रंगाचे डबे, सीएफएल बल्ब, घरगुती इंजेक्शन, इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, पाच घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. प्रत्येक घंटा गाडीला घातक कचऱ्यासाठी वेगळे कंपार्टमेंट बनवले आहे. गोळा झाल्यानंतर कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते, यामध्ये इन्सिनेटर मशीन द्वारे सर्व कचरा एकत्र करून, त्याचे व्यवस्थापन करण्यात येते.

बांधकाम आणि पाडकाम राडारोडा : (Construction and Demolition Waste)

शिराळा नगरपंचायत मार्फत शहरातून प्रतिदिन सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 टन राडारोडा कचरा तयार होतो. हा कचरा ज्या घरांचे नूतनीकरण अथवा दुरुस्तीचे काम सुरू आहे तेथून गोळा करण्यात येतो. यामध्ये दगड, वीट, वाळू, माती, लाकूड, धातू इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, एका ट्रॅक्टर द्वारे गोळा केला जातो. गोळा झाल्यानंतर सदर प्रकारचा कचरा पुनर्वापरासाठी वापरला जातो. यामध्ये नवीन बांधकामाची पायाभरणी करणे, अथवा भराव टाकण्यासाठी वापरला जातो.