महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 105 अन्वये नगरपालिकेमार्फत लावणेत येणारे सक्तीचे व ऐच्छिक कर.
अ)
मालमत्तेवरील एकत्रित कर
सर्वसाधारण कर
सर्वसाधारण पाणीपट्टी
दिवाबत्ती कर
सर्वसाधारण स्वच्छता विषयक कर
विशेष शौचकुप कर
अग्निशमन कर
पर्यावरण कर
पाणीपुरवठा लाभ कर
मलप्रवाह सुविधा लाभकर
पथकर
ब)
चित्रपट, नाट्यगृहे, सर्कशी, आनंदबाजार व इतर प्रयोग व प्रदर्शने यांवरील कर
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 108 अन्वये नगरपालिकेमार्फत बसविणेत येतील असे इतर कर.
अ)
स्वार होण्यासाठी, ओढण्यासाठी किंवा ओझे वाहण्यासाठी वापरण्यात येणारी व नगरपालिका क्षेत्रामध्ये उपयोग करण्यासाठी ठेवलेली (मोटार वाहन अधिनियम 1939 यात व्याख्या केलेल्या मोटार वाहनाव्यतिरिक्त) सर्व वाहने, नावा किंवा जनावरे यांवरील कर, मग ती प्रत्यक्षरित्या अशा क्षेत्रात ठेवण्यात येत असोत किंवा बाहेर ठेवण्यात येत असतो.
ब)
वर विनिर्दिष्ट केल्याप्रमाणे वापरण्यात येणा-या व नगरपालिका क्षेत्रामध्ये प्रवेश करणा-या परंतू खंड (अ) अन्वये करपात्र नसना-या वाहनांवरील (मुंबई मोटार वाहन कर अधिनियम, 1958 च्या कलम 20 मध्ये तरतूद केली असेल त्याच्याव्यतिरिक्त मोटार वाहन वगळून) व जनावरावरील पथकर.
क)
नगरपालिका क्षेत्रामध्ये ठेवलेल्या कुत्र्यांवरील कर.
ड)
यापुढे आवश्यक असल्याप्रमाणे नोटीस दिल्यानंतर नगरपालिकेच्यामार्फत साफ करण्यात येत असतील असे खाजगी संडास, जागा किंवा आवार यावरील विशेष स्वच्छता कर.
ई)
जलनिस्सारण कर
फ)
वैयक्तिक प्रकरणात नगपालिकेने पुरविलेल्या पाण्यावरील विशेष पाणीपट्टी अशा पाणीपुरवठ्याचा आकार कोणत्याही वर्गातील प्रकरणाच्या बाबतीत किंवा कोणत्याही वर्गातील प्रकरणाच्या बाबतीत किंवा कोणत्याही एखाद्या वैयक्तिक प्रकरणात बदलत्या परिस्थितीनुरूप सुयोग्य अशा पध्दतीने किंवा पध्तींनी ठरविण्यात येईल.
ग)
नगरपालिकेच्या हद्दीतील पवित्र ठिकाणी नियत कालावधीने येणा-या यात्रेकरूंवरील कर.
ह)
विशेष शिक्षण कर
य)
राज्य विधानमंडळास, भारतीय संविधानान्वये, राज्यात जो कोणत्याही कर लादण्याचा अधिकार आहे असा (व्यवसाय, व्यापार, आजीविका व नोक-यांवरील कराव्यतिरिक्त) इतर कोणताही कर.
परंतू खाजगी संडास, जागा किंवा आवार यांच्यासंबंधात, जोपर्यंत नगरपालिकेकडून-
(एक)
स्वताच्या श्रमिकांद्वारे ती साफ करण्याची किंवा मलप्रवाह नगरपालिकेच्या मलप्रणालात नेऊन सोडण्याची किंवा जमा करण्याची तरतूद केली जात नाही आणि
(दोन)
असा कर ज्याच्यावर लादावयाचा त्या व्यक्तीस प्रत्येकी किंवा असा कर ज्या नगरपालिका क्षेत्रामधील किंवा त्यांच्या भागामधील रहिवाशांवर बसवावयाचा त्या रहिवाशांस सर्वसाधारणपणे अशा रितीने सफाई काम करण्याचा व असा कर लादण्याचा आपला इरादा असल्याची एक महिन्याची नोटीस देण्यात येत नाही
तोपर्यंत, नगरपालिकेला कोणताही स्वच्छता कर बसविता येणार नाही.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 105 अन्वये नगरपालिकेमार्फत लावणेत येणारे सक्तीचे व ऐच्छिक कर.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम 1965 चे कलम 108 अन्वये नगरपालिकेमार्फत बसविणेत येतील असे इतर कर.