शिराळा नगरपंचायत, शिराळा.

ऑफिस फोन: (०२३४५) २७२ २१२, २७२ ०११

लेखा विभाग

  • श्री. नितीन दशरथ गाढवे
    मा. प्रशासक तथा मुख्याधिकारी
  • श्री हणमंत अरविंद कांबळे
    लेखापाल व लेखापरिक्षक
  • श्री अल्लाउद्दीन गणी मुंडे
    सहा. लेखापाल

कामकाज

  • १. नगरपंचायत अधिनियम तसेच इतर अधिनियम /नियम किंवा शासनाच्या आदेशानुसार नगरपंचायत स्तरावर ठेवण्यात येणा-या सर्व निधी / योजना प्रकल्पसाठीचे विशेष निधीचे महाराष्ट्र नगरपंचायत लेखा संहिता व संबंधित नियमानुसार व्यवस्थापनाची जबाबदारी पार पाडणे.
  • २. सर्व निधीचे योजना निहाय आवश्यक लेखे व ताळमेळ ठेवणे व जतन करणे. प्रत्येक महिन्या अखेरीस प्रत्येक खात्यातील जमा-खर्च मुख्याधिकारी यांना सादर करणे. वेळोवेळी रोकडवही वर स्वाक्षरी करणे.
  • ३. योजना निहाय उपयोगिता प्रमाणपत्र तयार करणे व शासनास सादर करणे.
  • ४. नगरपंचायतीचे वार्षिक अंदाजपत्रक लेखासंहिता नियमानुसार तयार करणे. अंदाजपत्रक तयार करीत असताना शासन निर्णय/निर्देश यानुसार विविध दुर्बल घटकांसाठी विहित करण्यात आलेली तरतूद ठेवणे. मंजूर अंदाजपत्रकानुसार निधी अंतर्गत जमा/खर्च, गुंतवणूक या बाबीवर नियंत्रणात मुख्याधिकारी यांना सहाय्य करणे.
  • ५. नगरपंचायत / शासन स्तरावर आवश्यक लेखा विषयक सर्व माहिती संकलन व सादरीकरण करणे.
  • ६. विविध विभागांकडून सादर होणा-या देयकासंबंधी लेखासंहिता, स्थायी निर्देश व शासन निर्णय नुसार योग्य ती कार्यवाही करणे.
  • ७. देयकातून करण्यात येणा-या शासकीय कपाती उदा. आयकर, वस्तू व सेवा कर, गौणखनिज, कामगार विमा व इतर प्रत्येक महिन्यांचे भरणा करून तसा अहवाल मासिक अहवाल मा.मुख्याधिकारी यांचेकडे सादर करणे.
  • ८. प्रत्येक महिना अखेरीस प्रत्येक खात्यातील जमा व खर्च मुख्याधिकारी यांना सादर करणे.
  • ९. वित्तीय बाब अंतर्भूत असलेल्या प्रत्येक बाबींचे/संपुर्ण निविदा प्रक्रियांचे (निविदा ते प्रदान) अंतर्गत लेखापरिक्षण करून मुख्याधिकारी यांना शिफारस करणे/अहवाल सादर करणे.
  • १०. सर्व विभागांच्या वसुली कारकून यांचेकडून वसूल होणा-या दैंनदिन रकमा संबंधित खात्यात भरणा करणे.
  • ११. वरिष्ठ कार्यालयाकडून वेळोवेळी मागविण्यात आलेली माहिती संबंधित कार्यालयास तात्काळ सादर करणे.
  • १२. मासिक जमा-खर्च अहवाल महिन्याच्या 05 तारखेला मा.मुख्याधिकारी यांना सादर करणे.
  • १३. स्थानिक निधी लेखा अधिनियम व नियम अंतर्गत प्रस्तावावर कार्यवाही / वसुली संबंधी कार्यवाही पार पाडणे.
  • १४. शासनाकडून वेळोवेळी प्राप्त होणारे ई मेल ची माहिती भरणे.
  • १५. वरिष्ठ कार्यालयाकडून नियोजित होणा-या बैठकीस उपस्थित रहाणे.
  • १६. मा.मुख्याधिकारी यांनी दिलेली जबाबदारी पार पाडणे.