सुका कचरा: (Dry Waste)
शिराळा नगरपंचायत मार्फत 20000 लोकसंख्येचा प्रतिदिन 1.8 टन सुका कचरा तयार होतो. हा सुका कचरा हॉटेल, बस्थानक, शासकीय कार्यालये , शाळा, दवाखाने आणि घरांमधून गोळा करण्यात येतो. यामध्ये प्लास्टिक, कपडा, काच, कागद, पुठा, लोखंड इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते.
हा सर्व तयार झालेला सुका कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, पाच घंटागाडीद्वारे गोळा केला जातो.
गोळा झाल्यानंतर सुका कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते, यामध्ये बेलिंग मशीन द्वारे सर्व कचरा एकत्र करून, प्लास्टिक पासून ऑइल काढण्यासाठी वापरला जातो.
स्वच्छ सर्वेक्षण 2022-23 अंतर्गत चला नगरपंचायतने केलेली कार्यवाही खालील प्रमाणे.
कचरा प्रकार आणि वर्गीकरण तक्ता
ओला कचरा: (Wet Waste)
शिराळा नगरपंचायत मार्फत 20000 लोकसंख्येचा प्रतिदिन 2.7 टन ओला कचरा तयार होतो. हा ओला कचरा हॉटेल आणि घरांमधून गोळा करण्यात येतो. यामध्ये भाज्यांची देठे, अंड्याची टरफले, पालापाचोळा, इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला ओला कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, पाच घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. गोळा झाल्यानंतर कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते, यामध्ये श्रेडींग मशीन द्वारे सर्व कचरा बारीक करून, खत करण्यासाठी वापरला जातो. तसेच भविष्यात कचऱ्यापासून गॅस तयार करण्याचे उद्दिष्ट आहे.
सुका कचरा: (Dry Waste)
शिराळा नगरपंचायत मार्फत 20000 लोकसंख्येचा प्रतिदिन 1.8 टन सुका कचरा तयार होतो. हा सुका कचरा हॉटेल, बस्थानक, शासकीय कार्यालये , शाळा, दवाखाने आणि घरांमधून गोळा करण्यात येतो. यामध्ये प्लास्टिक, कपडा, काच, कागद, पुठा, लोखंड इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला सुका कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, पाच घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. गोळा झाल्यानंतर सुका कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते, यामध्ये बेलिंग मशीन द्वारे सर्व कचरा एकत्र करून, प्लास्टिक पासून ऑइल काढण्यासाठी वापरला जातो.
घरगुती घातक आणि कचरा : (Domestic Hazardous and Sanitary Waste)
शिराळा नगरपंचायत मार्फत 20000 लोकसंख्येचा प्रतिदिन 0.0016 टन घातक कचरा तयार होतो. हा कचरा हॉटेल आणि घरांमधून गोळा करण्यात येतो. यामध्ये सॅनिटरी नॅपकिन, औषधाचे डबे, रंगाचे डबे, सीएफएल बल्ब, घरगुती इंजेक्शन, इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, पाच घंटागाडीद्वारे गोळा केला जातो. प्रत्येक घंटा गाडीला घातक कचऱ्यासाठी वेगळे कंपार्टमेंट बनवले आहे. गोळा झाल्यानंतर कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने प्रक्रिया केली जाते, यामध्ये इन्सिनेटर मशीन द्वारे सर्व कचरा एकत्र करून, त्याचे व्यवस्थापन करण्यात येते.
बांधकाम आणि पाडकाम राडारोडा : (Construction and Demolition Waste)
शिराळा नगरपंचायत मार्फत शहरातून प्रतिदिन सर्वसाधारणपणे 1.5 ते 2 टन राडारोडा कचरा तयार होतो. हा कचरा ज्या घरांचे नूतनीकरण अथवा दुरुस्तीचे काम सुरू आहे तेथून गोळा करण्यात येतो. यामध्ये दगड, वीट, वाळू, माती, लाकूड, धातू इत्यादी प्रकारात वर्गीकरण करता येते. हा सर्व तयार झालेला कचरा शहराच्या 17 प्रभागांमधून, एका ट्रॅक्टर द्वारे गोळा केला जातो. गोळा झाल्यानंतर सदर प्रकारचा कचरा पुनर्वापरासाठी वापरला जातो. यामध्ये नवीन बांधकामाची पायाभरणी करणे, अथवा भराव टाकण्यासाठी वापरला जातो.
स्वच्छ सर्वेक्षण 2022 -23 अंतर्गत नगरपंचायतने केलेली लोकसहभाग आणि जनजागृती कामे
150 दिवस गुणांकण तक्ता
शिराळा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक 2025
अंतिम मतदार यादी प्रभाग 17
अंतिम मतदार यादी प्रभाग 16
अंतिम मतदार यादी प्रभाग 15
अंतिम मतदार यादी प्रभाग 14