संविधान दिनानिम्मित उद्या शिराळ्यात वॉक फॉर संविधान पदयात्रेचे आयोजन

२६ नोव्हेंबर १९४९ रोजी स्वतंत्र भारताच्या संविधान सभेने अंगीकृत व अधिनियमित करून स्वत:प्रत अर्पण केलेल्या भारतीय संविधानाची मौलिक तत्वे, संवैधानिक हक्क आणि कर्तव्ये शहरातील नागरिकांना संस्कारित करीत असतात हीच तत्वे नागरिकांपर्यंत पोहोचवणे तसेच शालेय जीवनातच विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवणे व त्यांना देशाचे जागरूक नागरिक बनवणे यां हेतूने शिराळा नगरपंचायत कार्यालायामार्फत २६ नोव्हेंबर २०२२ रोजी शिराळा तालुका न्याय व विधी सेवा समिती व शिराळा तालुका संविधान जागृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातून वॉक फॉर संविधान म्हणजेच संविधान पदयात्रेचे आयोजन करण्यात येत आहे. या पदयात्रेची सुरुवात उद्या दिनांक २६/११/२०२२ रोजी सकाळी १०:१५ वाजता जागतिक वारसा साप्ताह समाप्तीच्या पार्श्वभूमीवर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावरून होईल, तद्नंतर हि पदयात्रा शहरातील लक्ष्मी चौक, पोटे चौक, मरिमी चौक, गुरुवार पेठ मार्गे व्यापारी असोसिएशन हॉल पर्यंत असेल. व्यापारी असोसिएशन सभागृहात २६/११/२००८ रोजीच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात येईल. व शिराळा तालुका संविधान जागृती मंचच्या वतीने शिराळा दिवाणी न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश मा. श्री. एस. ए.सुरजुसे व सहकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजीत परिसंवादामार्फत राज्यशास्त्राचे प्राध्यापक मा. श्री. संतोष खडसे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आलेले आहे. शिराळा नगरपंचायत मार्फत आयोजित या शहरातील जास्तीत जास्त नागरिकांनी या वॉक फॉर संविधान रॅलीत सहभागी होऊन परिसंवादाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील व शिराळा तालुका न्याय व विधी सेवा समिती यांनी शहरातील नागरिकांना केले आहे.

दत्त नागरी संस्थेस शिराळा नगरपंचायत मार्फत बर्ड फीडरचे वाटप
शिराळा शहरात जागतिक वारसा सप्ताह साजरा दिनांक