आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी गड- किल्ले , गुहा, स्मारके, मूर्ती, शिलालेख यांसारख्या अनेक गोष्टी निर्माण केल्या पण आपल्या पूर्वजांनी आपल्यासाठी मागे सोडलेला हा अनमोल वारसा जतन करणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याचा संदेश शिराळा शहरातील नागरिकांपर्यंत पोहोचावा व त्यांनी आपल्या शहराच्या या अनमोल वारशाचे जतन व संवर्धन करावे या हेतूने शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून जागतिक वारसा साप्ताह साजरा करत या अमूल्य ठेव्याबद्दल आदर, सद्भावना व सहानुभूती व्यक्त करण्यात आली. यावेळी शहराला लाभलेला ऐतिहासिक वारसा असलेल्या भुईकोट किल्ला परिसराची व या परिसरातील वारसा वृक्षांची स्वच्छता करून घेण्यात आली. तसेच पाडळी रोड ते करमाळे रस्ता येथील नव्याने लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची मशागत करून हि वृक्षे सुद्धा वारसा वृक्षे म्हणून गणली जावीत यासाठी प्रयत्नशील राहण्याचा मानस यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी व्यक्त केला.
वॉक फॉर संविधान
टाकाऊ वस्तू पासून नाविन्यपूर्ण कल्पक वस्तू प्रदर्शन