भारतीय प्रजासत्ताक दिनाचा 73 वा  वर्धापन दिन. आज शिराळा नगरपंचायत कार्यालयात मोठ्या दिमाखात व हर्ष उल्लाहासात साजरा करण्यात आला.  नगरपंचायतीचे मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यानंतर राष्ट्रध्वजाला राष्ट्रगीताची सलामी देणेत आली. त्यानंतर स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल चा विद्यार्थ्यांनी स्वच्छ भारत, स्वस्थ भारत चा संदेश देत आपले पथनाट्य सादर केले. तसेच  शहरातील अंगणवाडीतील विद्यार्थ्यांनी देशपर भाषणे सादर केलीत. या समारंभावेळी माजी नगराध्यक्षा, माजी उपनगराध्यक्ष, माजी नगरसेवक व नगरसेविका, माजी जि.प.सदस्य, माजी प. स. सदस्य , माजी सरपंच व माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच शहरातील प्रतिष्ठीत नागरिक व व्यापारी तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी, अंगणवाडी सेविका , विद्यार्थी , स्वामी विवेकानंद पब्लिक स्कूल चे शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते……

शहरातील सुमारे ३६५० नळ कनेक्शना वॉटर मीटर बसविण्यात आली आहेत
शहरातील महिला व मुलींना आत्मनिर्भर व खंबीर व नेतृत्वशाली बनवण्यासाठी स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण