शहरातील महिलांना एक खंबीर व आत्मनिर्भर नारीशक्ती म्हणून वेगळी ओळख मिळवून देत, शिराळा शहरातील १०० मुलींसाठी मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षणाची सुरुवात 12 जानेवारी 2023 पासून करण्यात आली होती, या प्रशिक्षणार्थीना गणवेश वितरण व या प्रशिक्षणाच्या प्रात्यक्षिक सादरीकरणाचा कार्यक्रम दिनांक २७/०३/२०२३ रोजी सदगुरू प्राथमिक व माध्यमिक आश्रम शाळेच्या मैदानावर शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
यावेळी या प्रशिक्षणासाठी लाभलेले प्रशिक्षक श्री. नागनाथ घाटगे यांनी शिराळा नगरपंचायत मार्फत आयोजित या प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले आणि या अभिनव उपक्रमाबद्दल नगरपंचायत चे आभार मानले. प्रशिक्षण घेणाऱ्या मुलींनी आपले मनोगत व्यक्त करताना, या प्रशिक्षणामुळे आम्हाला धाडसी व निर्भय होण्यास मदत झाल्याचे सांगितले. तसेच त्यांच्या पालकांनीही या नाविन्यपूर्ण प्रशिक्षण मुलींच्या भविष्यासाठी अतिशय फायदेशीर ठरणार असल्याचे सांगत आपल्या पाल्याच्या मन , मेंदू , मनगट या त्रिसूत्री गुणांचा विकास झाल्याचे व मुलींना आत्मनिर्भर बनविण्यास नगरपंचायत ने केलेले प्रयत्न पाहून समाधान मनोगतातून व्यक्त केले. प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करत हा उपक्रम राबवीत असताना जिल्ह्यातील नगरपालिकांमार्फत आयोजित हा पहिलाच उपक्रम असल्याने सुरुवातीच्या काळात मिळालेला अत्यल्प प्रतिसाद परंतु तदनंतर मुलींचा लाभलेला उस्फुर्त सहभाग पाहून समाधान व्यक्त केले. प्रशिक्षनादरम्यान गणवेशाची निकड लक्षात घेऊन अतिशय कमी वेळात गणवेशही उपलब्ध करून देत यावेळी त्यांनी येलो बेल्ट प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना ऑरेंज बेल्टचे प्रशिक्षणासाठीही नगरपंचायतकडून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. या मुलीना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मुलीना गणवेश वितरण करण्यात आले. या प्रशिक्षण कालावधीत मुलीना शिकवण्यात आलेल्या विविध डावपेचांचे सुबक व नेत्रदीपक प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आले. शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी व कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी मुलींचे पालक उपस्थित होते.