शिराळा नगरपंचायत कार्यालायामार्फत माझी वसुंधरा अभियान 3.0 शहर सौंदर्यीकरण व स्वच्छता अभियान तसेच स्वच्छ सर्वेक्षण २०२३ अंतर्गत जलस्त्रोत जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने शिराळा नगरपंचायत कार्यालयाचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या संकल्पनेतून शहरातील ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या व ब्रिटीशकालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ठ नमुना म्हणून नावारूपास आलेले शहरातील पूल संवर्धित व सुशोभित करत हि ठिकाणे प्रेक्षणीय बनवण्याचा उपक्रम हाती घेऊन या पुलाखालील ओढ्याच्या पात्राची स्वच्छता करून ओढ्याच्या पात्रात पाणी बचतीचे महत्व सांगणारे चित्र रेखाटण्यात आले. शहरातील दत्त मंदिर परिसरातील पुलाचे सुशोभीकरण करण्याच्या प्रयत्नात पुलाची पडझड दुरुस्त करून टाकाऊ टायर चा पुनर्वापर करून त्यात विविध फुलझाडांची रोपे लाऊन या पुलावर आकर्षक उभा बगीचा ( Vertical Garden) निर्माण करण्यात आला. या पुलाचे सुशोभीकरण व सौंदर्य रात्रीच्या वेळीही उठावदार व्हावे यासाठी या पुलावर नयनरम्य व आकर्षक विद्युत रोषणाईही करण्यात आलेली आहे. दिनांक १६/०४/२०२३ पासून सुरु होणाऱ्या गोरक्षनाथ यात्रेचे औचित्य साधत शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत नागरिकांना हा पूल पाहणी व विरंगुळ्याचे ठिकाण म्हणून खुला करण्यात आलेला आहे. यावेळी शिराळा नगरपंचायत कार्यालयाचे शिराळा नगरपंचायतचे अधिक्षक संजय इंगवले बांधकाम अभियंता आनंदबाबू औताडे , पा.पु.अभियंता शरदचंद्र पाटील, आस्थापना विभाग प्रमुख सुविधा पाटील,आरोग्य विभाग प्रमुख अर्चना गायकवाड, गणपती इंगवले, कृष्णात नलवडे, सदानंद टिळे, विजय शिंदे, लक्ष्मण मलमे, काजोल शिंदे, आबाजी दिवाण, प्रिती पाटील सागर दाभाडे,तात्यासो कांबळे नितीन कुरणे प्रणव महाजन इ. उपस्थित होते.

प्लास्टिक बंदीबाबत जाहीर सूचना (एकल वापराच्या प्लास्टिक वस्तूंचे उत्पादन, व्यापार, साठा, वितरण, विक्री आणि वापरावर बंदी घालण्याची सूचना)
जल शुध्दीकरण केंद्रात सोलर पॅनेल बसविण्याचे नियोजन केले