उक्ती तशी कृती चे मुर्तीमंत आदर्श उदाहरण असणाऱ्या व मागील २ शतकापासूनच समाजाचा आरसा म्हणून ओळखल्या गेलेल्या स्वच्छता प्रिय संत गाडगे महाराजांची पुण्यतिथी आज शिराळा शहरात उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी शिराळा शहरातील प्रमुख बाजारापेठेचा परिसर असणाऱ्या मरीमी चौक येथे संत गाडगे महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत गाडगे महाराजांच्या गाव व शहर स्वच्छतेचा वसा अविरत पुढे चालवणाऱ्या शिराळा नगरपंचायत कडील स्वच्छता दूतांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या दूतांच्या कार्याचा व पर्यायाने गाडगे महाराजांच्या समाजसुधारक विचाराचाही गौरव करण्यात आला. यावेळी श्री. गणेश यादव यांनी या कार्यक्रमाची प्रस्तावना सादर करत संत गाडगे महाराजांचे विचार नागरिकांसमोर मांडले. अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे श्री. विजय जोखे यांनी गाडगे महाराजांच्या आयुष्यातील प्रसंग मांडून त्यांची व त्यांच्या विचाराची महती उपस्थितांसमोर विषद केली.यावेळी शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी संत गाडगे महाराजांच्या विचाराप्रती कृताज्ञशिलता व्यक्त करत त्यांचे विचार आजच्या पिढीने अभ्यासून ते आचरनातंही आणण्याची गरज असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त केले. यावेळी त्यांनी नगरपंचायत कडील स्वछातादुताना या थोर महापुरुषास अभिवादन करण्याचा सन्मान बहाल केल्याबद्दल उपस्थित सर्व सन्माननीय संयोजकांचे आभार मानले. यावेळी शिराळा शहरातील नागरिक तसेच शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सफाई कर्मचारी ट्रेनिंग
येणारा गुढी पाडवा सण नवीन घरात साजरा करण्याचे प्रशासकांचे लाभार्थ्यांना आवाहन