शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत श्रमदान करण्यात आले
शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत आज दिनांक 18/1/2023 रोजी श्रमदान करण्यात आले. यावेळी नगरपंचायत मार्फत लावलेल्या झाडांना ठिबक सिंचन बसविण्यात आले. पाडळी रोड, चांदोली रोड आणि प्राध्यापक कॉलनी या ठिकाणी ठिबक सिंचन पाईप बसवण्यात आल्या. झाडांना ठिबक सिंचन केल्यामुळे, रोपांना इथून पुढे चांगल्या प्रमाणात पाण्याची उपलब्धता होणार आहेआणि गाव सुंदर हरित होण्यास यामुळे मदत होणार आहे.
तरी नागरिकांनीही त्यांच्या परिसरातील झाडांना/ रोपांना पाणी घालून सहकार्य करावे, असे आवाहन नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. योगेश पाटील यांनी केले आहे.
शिराळा नगरपंचायत मार्फत पत्रकार दिन साजरा
शहरातील सुमारे ३६५० नळ कनेक्शना वॉटर मीटर बसविण्यात आली आहेत