शिराळा तालुक्यात पत्रकारितेच्या माध्यमातून वर्षोनुवर्षे समाजप्रबोधनाचे कार्य निरपेक्षपणे आणि नि:स्वार्थीपणे करत, आपल्या अखंड जनसेवेचे व्रत घेतलेल्या पत्रकारांच्या लेखणीला सामर्थ्यवान आणि बलशाली करण्याच्या उदात्त हेतूने, शिराळा नगरपंचायत मार्फत पत्रकार दिनाचे औचित्य साधत एक नामवंत कर्तव्यदक्ष पत्रकार म्हणून शहरातील सर्व दैनिकांचे प्रतिनिधी असणाऱ्या पत्रकार बांधवांचा सन्मान सोहळा नगरपंचायत सभागृहात आयोजित करण्यात आला. आपल्यासारख्या निर्भीड पत्रकारांमुळेच लोकशाहीचा चौथा स्तंभ आजही भक्कम आहे. असे मनोगत व्यक्त करत, आपल्या लेखनिमार्फत नगरपंचायत कार्यालयाच्या कामाची सदैव दखल घेऊन प्रसंगी कानउघडणीही बिनचूक केल्याबद्दल शिराळा नगरपंचायत चे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश पाटील यांनी त्यांच्या समाजाप्रतीच्या बांधिलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी प्रशासकांनी उपस्थित सर्व पत्रकार बांधवाना महाराष्ट्रीयन फेटे नेसवत सन्मानचिन्ह, रोजनिशी, लेखणी व पुष्परोप देऊन सन्मानित केले.
आयुष्मान भारत गोल्डन कार्ड लाभार्थीसाठी शिबीर आयोजन
शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत श्रमदान करण्यात आले