शहरातील महिलांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देऊन, त्यांना एक खंबीर व आत्मनिर्भर नारीशक्ती म्हणून वेगळी ओळख मिळवून देण्याच्या उद्देशाने , राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधत, शिराळा नगरपंचायत मार्फत महिला व बालकल्याण निधी अंतर्गत, गुरुवार पेठ व्यापारी असोसिएशन सभागृह येथे दिनांक १२/०१/२०२३ पासून १६ वर्षांवरील मुली व महिलांसाठी सायंकाळी ४ ते ५:३० या वेळेत स्वसंरक्षण प्रशिक्षण व वय वर्षे ८ ते १६ या गटातील मुलींसाठी सायंकाळी ६ ते ७:३० या वेळेत येलो बेल्ट मार्शल आर्ट (कराटे) प्रशिक्षण आयोजीत करण्यात येत आहे.
तरी शहरातील जास्तीत जास्त महिला व मुलीनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा. असे आवाहन शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री. योगेश बाळकृष्ण पाटील यांनी केले आहे.