मा. डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान शिराळा, श्री बैठक शिराळा व शिराळा नगरपंचायत शिराळा यांच्या विद्यमाने महास्वच्छता अभियान मोहीम आज दिनांक 1/3/2023 रोजी, संपूर्ण शिराळा शहरात राबवण्यात आले. या स्वच्छता मोहिमेची सुरुवात शिराळा मार्केट यार्ड येथून करण्यात आली, त्यासोबत शिराळातील विविध सार्वजनिक ठिकाण ची स्वच्छता करण्यात आली. यावेळी नगरपंचायत चे सर्व कर्मचारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

स्वच्छता करण्यात आलेली ठिकाणी-

मार्केट यार्ड परिसर,

बस स्थानक शिराळा,

माने कॉर्नर शिराळा,

दत्त मंदिर परिसर शिराळा,

तोरणा ओढा परिसर,

अंबामाता मंदिर परिसर ,

बिरोबा डोह शिराळा

इत्यादी सर्व परिसरातून सात ते आठ ट्रॉली ओला आणि सुका कचरा गोळा करण्यात आला.

संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गाडगेबाबांचे स्वच्छता दूत म्हणून सन्मानित केले.
शिराळा नगरपंचायत मार्फत मार्शल आर्ट चे प्रशिक्षण कार्यक्रम संपन्न..