शिराळा : दिनांक 23/02/2023 रोजी, संकल्प फाउंडेश च्या वतीने संत गाडगेबाबा यांची जयंती शिराळा नगरपंचायतीच्या सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गाडगेबाबांचे स्वच्छता दूत म्हणून सन्मानित करून साजरी केली.

शहराचे स्वच्छता करण्यासाठी सर्व सफाई कर्मचारी दिवस रात्र राबवत असतात, प्रत्येक घरात कचरा गोळा करून, ओला सुखा वेगळा करणे , गोळा केलेला कचऱ्यावर प्रोसेस करणे, त्यापासून खत तयार करणे अशी जिकरीची कामे ते रोज करत असतात.

शिराळा येथे संत गाडगे महाराज यांच्या जयंती निमित्त संत गाडगे महाराज सांस्कृतिक भवन येथे संकल्प फाउंडेशनच्यावतीने सर्व सफाई कर्मचाऱ्यांच्या आयोजित सन्मान सोहळा घेण्यात आला. अध्यक्षस्थानी संकल्प फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष रवी यादव होते. संत गाडगे महाराज पतसंस्थेचे संचालक रमेश यादव,फाउंडेशनचे उपाध्यक्ष सुभाष कदम यांची प्रमुख उपस्थिती होती.

सर्व सफाई कर्मचाऱ्याना सन्मानपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. शिराळा तालुका कामगार परिषदेचे अध्यक्ष मारुती रोकडे, कैलास देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

स्वागत व प्रास्ताविक गणेश यादव यांनी केले. यावेळी फाउंडेशनचे सचिव महादेव परिट, खजिनदार अविनाश यादव, संचालक सुभाष दळवी, सुयोग यादव, वैभव तेली, शिवाजीराव चौगुले, रविंद्र यादव, जितेंद्र गायकवाड,विजय कांबळे, व नगरपंचायतीचे सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते. आभार रवी यादव यांनी मानले.

जिल्हा परिषद उर्दू शाळा मार्फत रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले
महास्वच्छता अभियान मोहीम