शहरातील महिलांना एक खंबीर व आत्मनिर्भर नारीशक्ती म्हणून वेगळी ओळख मिळवून देण्याच्या हेतून शिराळा नगरपंचायतीने महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत शिराळा शहरातील 100 मुलींसाठी मार्शल आर्ट कराटे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आलेले होते. सदरचे प्रशिक्षण दिनांक 12 जानेवारी 2023 पासून सुरु झाले असून त्यामध्ये एकूण 100 विद्यार्थींनी सहभाग नोंदविला होता. त्यापैकी 86 विद्यार्थींनीची GOJURYU NEEDUKAY KARATE CLASSES INDIA, HEAD OFFICE, MUMBAI यांच्यामार्फेत परिक्षा घेणेत आलेली असून सदर परिक्षेमध्ये उतीर्ण झालेल्या विद्यार्थींनीना दिनांक 10/04/2023 रोजी मा.प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आलीत. सदर प्रमाणपत्र वितरण दरम्यान विद्यार्थींनीनी या प्रशिक्षण कालावधीत शिकवण्यात आलेल्या विविध डावपेचांचे सुबक व नेत्रदीपक प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी प्रशासक तथा मुख्याधिकारी यांनी आपले मनोगत व्यक्त करत हा उपक्रम राबवीत असताना जिल्ह्यातील नगरपालिकांमार्फत आयोजित हा पहिलाच उपक्रम असून मुलींचा लाभलेला उस्फुर्त सहभाग पाहून समाधान व्यक्त करुन येलो बेल्ट प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या मुलींना ऑरेंज बेल्टचे प्रशिक्षण ही नगरपंचायतकडून उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. या मुलीना त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या. यावेळी या प्रशिक्षणासाठी लाभलेले प्रशिक्षक श्री. नागनाथ घाटगे यांनी शिराळा नगरपंचायत मार्फत आयोजित या प्रशिक्षण उपक्रमाचे कौतुक केले आणि या अभिनव उपक्रमाबद्दल नगरपंचायत चे आभार मानले. यावेळी शिराळा नगरपंचायत अधिक्षक संजय इंगवले, महिला व बालकल्याण विभाग प्रमुख अर्चना गायकवाड, शरदचंद्र पाटील, गणपती इंगवले, काजोल शिंदे, प्रिती पाटील, लक्ष्मण मलमे, तात्यासो कांबळे, गणेश काशिद, प्रणव महाजन व प्रशिक्षणार्थी मुली व त्यांचे पालक उपस्थित होते.