शिराळा शहराला स्वच्छ, सुंदर, हरित व पर्यावरण पूरक शहर अशी ओळख निर्माण करून देणेचा संकल्प सिद्धीस नेण्यासाठी शिराळा नगरपंचायत कडून स्वच्छ सर्वेक्षण २०२३, माझी वसुंधरा अभियान तसेच शहर सौंदर्यीकरण अभियान राबविले जात आहे. या अभियानाची व्याप्ती घराघरात पोहोचावी व या उपक्रमात शाळांचा व विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्याच्या हेतूने शिराळा नगरपंचायतचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा. श्री योगेश बाळकृष्ण पाटील यांच्या कल्पनेतून विविध शालेय गटाअंतर्गत जिल्ह्यातील प्रथमच टाकाऊ वस्तूंपासून नाविन्यपुर्ण कलात्मक वस्तुंचे प्रदर्शन दिनांक 12/12/2022 ते दिनांक 16/12/2022 या कालावधीत पार पडले. त्याचा बक्षिस वितरण सोहळा शिराळा पंचायत समितीचे शिक्षणाधिकारी मा.श्री. प्रदिपकुमार कुडाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यातील गटनिहाय विजेते पुढीलप्रमाणे – सामुहिक गटात – जिल्हा परिषद उर्दु शाळा क्र.4 (प्रथम क्रमांक), न्यू इंग्लिश स्कुल (द्वितीय क्रमांक), सदगुरु माध्यमिक आश्रम शाळा (तृतीय क्रमांक), सक्सेस अकॅडमी (उत्तेजनार्थ) तसेच वैयक्तिक प्रकारात मोठा गटात स्वरुप शामराव कुंभार (प्रथम क्रमांक ), नातेश शंकर लोहार (द्वितीय क्रमांक), अथर्व मकरंद जोशी (तृतीय क्रमांक), यशचिराग चंदर धस (उत्तेजनार्थ), लहान गटात वैष्णवी सुभाष नलवडे (प्रथम क्रमांक), तौसिफ मोहम्मद शमीम चौधरी (द्वितीय क्रमांक), जियान निसार मुल्ला (तृतीय क्रमांक), सम्राट गणेश मदने (उत्तेजनार्थ) याप्रमाणे शाळा व विद्यार्थ्यांना रोख रक्कम, प्रोत्साहनपर पुस्तके, गौरवपत्र व वृक्ष स्वरुपात बक्षिस वितरण करत त्यांचा गौरव करण्यात आला. शिराळा नगरपंचायतीचे प्रशासक तथा मुख्याधिकारी मा.श्री.योगेश पाटील यांनी या स्पर्धेच्या आयोजनाबाबत पार्श्वभुमी व संकल्पना मांडत शाळांनी दिलेल्या उत्स्फुर्त प्रतिसाद व विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या विविध आकर्षक व कल्पक कलाकृती बद्दल शाळा , विद्यार्थी व पालकांचे आभार मानले. यानंतर गट शिक्षण अधिकारी मा.श्री.प्रदिपकुमार कुडाळकर यांची सिंधुदुर्ग जिल्ह्या परिषदेचे शिक्षणाधिकारी म्हणून पदोन्नती झालेबद्दल नगरपंचायतीच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी श्री.योगेश पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात आयोजित केलेल्या या अभिनव स्पर्धेबद्दल नगरपंचायतीचे कौतुक करत आभार मानले व या पुढेही आयोजित करणेत येणा-या स्पर्धेत सर्व शाळांचे उत्स्फुर्तपणे सहकार्य लाभेल अशी ग्वाही दिली. उपस्थित शाळांच्या शिक्षकांनी व पालकांनी आपले मनोगत व्यक्त करत मुलांना मोबाईलच्या दुनियेतून बाहेर काढत विद्यार्थ्यांच्या कल्पकतेला चालना देणेच्या हेतूने या स्पर्धा आयोजनाबद्दल आभार मानले. यावेळी सर्व शालेय शिक्षक,विद्यार्थी, पालक व शहरातील नागरीक तसेच नगरपंचायत अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते , सुत्रसंचालन कर निर्धारण अधिकारी अर्चना गायकवाड यांनी केले..

टाकाऊ वस्तू पासून नाविन्यपूर्ण कल्पक वस्तू प्रदर्शन
सफाई कर्मचारी ट्रेनिंग